Welcome to Yamuna Dairy Farm Products

नमस्कार !
यमुना डेअरी फार्म प्रॉडक्ट्स (१००% ऑरगॅनिक) आपणासाठी घेऊन येत आहे शुद्ध आणि ऑरगॅनिक पद्धतीची उत्पादने जे गीर गायी (अ २) दूध आणि दुधापासून बनवलेले आहेत.

  • असे तूप जे १००% शुद्ध दुधापासूनच बनवलेले असेल.
  • असे दही जे कोणतेही रसायन भेसळ न करता शुद्ध विरजन लावूनच बनवलेले असेल.
  • असे दूध जे गायीच्या पोटातून तुमच्या पोटात जाईल.


अशी इतर अनेक उत्पादने जी नैसर्गिक आणि सैन्द्रिय पद्धतीनेच बनवलेली असतील. आजच्या काळात लहान मुलांमध्ये आढळत असलेले हाडांचे विकार, कमी स्मरणशक्ती , वेळोवेळी होणारे पित्ताचे आजार, पोटाचे विकार, अशक्तपणा का दिसून येतात? पूर्वी कुटुंबामध्ये प्रत्येकाकडे स्वतःच्या घरच्या गायी असत, त्यामुळे शुद्ध व ताजे दूध कायमच उपलब्ध असे. त्यामुळे भेसळ किंवा इतर दोष नव्हते परंतु आजच्या काळात अशी परिस्थिती नाही. कोठेही खऱ्या दुधाची चव मिळत नाही. लहान मुलांच्या शरीराचे नैसर्गिक पोषण करणारे दूध मिळेनासे झाले आहे. तरुणांमध्ये आजचा आढळणारा आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, जळजळ, पित्त, शौचास त्रास, कॅल्शियम कमतरता, आळस इ. या सर्वांचे मूळ कारण म्हणजे आपल्या भेसळयुक्त दुधाचा व अन्नाचा वापर. आपण सर्वानी जर अशा प्रकारच्या दुधाला आणि अन्नाला नाकारले तरच आपण आपली प्रगती करू आणि एक सुंदर, स्वस्थ, निरोगी युवा पिढी तयार करू.

या बरोबरच यमुना डेअरी फार्म प्रॉडक्ट्स आणखी काही उत्पादने आपल्या सेवेत सादर करीत आहे. ती म्हणजे देशी दूध, देशी तूप, देशी गोमूत्र व गोनाईल, देशी गोमय(शेण), सेंद्रिय गुळ, सेंद्रिय कडधान्ये, लाकडी घाण्यावरील खाद्यतेले तसेच आयुर्वेदिक पदार्थांपासून बनविलेली दैनंदिन जीवनामध्ये लागणारे साबण, शाम्पू, हेअर ऑईल, मसाज ऑईल, दंतमंजन,फेसपॅक जे त्वचेचे विकार, केस गळती,दांत आणि हिरड्यांचे विकार,शारीरिक व्याधी आणि आपल्या सर्वांगीण विकासासाठी लाभदायी ठरतील.

संपूर्ण भारतामध्ये देशी गीर गाय(A२) उत्कृष्ट दर्जाचे दूध देण्यासाठी सुप्रसिद्ध आहे. महाराष्ट्रामध्ये हे दूध फारसे उपलब्ध होत नाही. अशा गीर गाईचे दूध व त्या दुधापासून बनवलेले इतर पदार्थ आणि सेंद्रिय उत्पादने आपण सर्वांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचे काम यमुना डेअरी फार्म प्रॉडक्ट्स चे प्रो. प्रा. श्री. परशुराम गुंजाळ करीत आहेत. तरी बंधू, भगिनी, मित्र परिवार आणि आजच्या युवा पिढीला सांगणे आहे की सर्वांनी या उत्पादनांचा आस्वाद व आनंद घ्यावा.
Green Pharmacy Products

यमुना डेअरी फार्म प्रॉडक्ट्स मध्ये आपण ग्राहकांना आयुर्वेदिक तसेच नैसर्गिक अनेक उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध करून देत आहोत. या मध्ये विविध प्रकारची बियाणे , देशी गीर A२ गायीच्या दूध आणि दुधापासून बनवलेल्या उत्पादनांचा समावेश आहे. आपल्या ग्राहकांसाठी आपण ग्रीन फार्मसी, पुणे यांची उत्पादने आपल्या थेरगाव येथील दुकानामध्ये उपलब्ध करून देत आहोत. ग्रीन फार्मसी, पुणे यांची विविध प्रकारची उत्पादने ज्यामध्ये स्किन केअर, हेअर केअर, ओरल केअर, होम केअर इ. यासारख्या अनेकी उत्पादनाचा समावेश होतो. ही सर्व उद्पादने आता यमुना डेअरी फार्म प्रॉडक्ट्स चे ग्राहक आता खरेदी करू शकतात. आयुर्वेदिक उत्पादन हेच ग्रीन फार्मसी चे वैशिष्ट्य आहे. यमुना डेअरी फार्म प्रॉडक्ट्स मध्ये ही सर्व उत्पादने आता आपल्याला खरेदी करता येतील.